Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया शर्माने केले शाहीर शेखचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 07:15 IST

स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका दाखल झाली आहे.

स्टार प्लस वाहिनीवर नुकतीच ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत मिष्टीची भूमिका रंगविणारी अभिनेत्री रिया शर्माने आपल्या अभिनय गुणांनी आणि पडद्यावरील आपल्या भारून टाकणाऱ्या अस्तित्वाद्वारे प्रेक्षकांचे लक्ष तर वेधले आहेच. शिवाय त्यांची प्रशंसाही मिळविली आहे. मालिकेत तिचा नायक शाहीर शेख असून तो अबीरची भूमिका साकारीत आहे. त्याच्याबद्दलच्या नात्याविषयी रियाने आपले मते नुकतीच व्यक्त केली.

रिया म्हणाली, “मी त्याला स्टार प्लसवरील ‘नव्या- नयी धडकन, नए सवाल’ या मालिकेत सर्वप्रथम पाहिले होते. त्यातील त्याचे काम मला खूप आवडले होते. त्याच्यासारख्या एका गुणी अभिनेत्याबरोबर एकत्र भूमिका रंगविण्याची संधी मला मिळत असल्याबद्दल मी आनंदी आहे. एक सहकलाकार म्हणून तो खूपच मदत करणारा आहे. सेटवर आमची खूप धमाल सुरू असते. ‘ये रिश्ते है प्यार के’मध्ये प्रेक्षकांना आमची जोडी पसंत पडू दे, अशी मी प्रार्थना करते.”

‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेच्या आगामी भागांत अबीर आणि मिष्टी यांच्यात काही रोमँटिक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यातील या दोघांमधील नाते पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्लसशाहीर शेख