Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया सेन ‘बिग बॉस’ सीजन-११ मध्ये झळकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 16:21 IST

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन ‘बिग बॉसच्या सीजन-११’ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या रिया बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्या ...

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन ‘बिग बॉसच्या सीजन-११’ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या रिया बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्या लाइफस्टाइलविषयी ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तर दरदिवसाला रिया काही ना काही शेअर करून फॅन्सला जोडलेली असते. आता पुढे आलेल्या माहितीनुसार रिया बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. ३५ वर्षीय रिया कोलकाता येथील रहिवासी आहे. ती अभिनयाबरोबरच एक चांगली मॉडेलदेखील आहे. रियाला अभिनयाचा वारसा घरातूनच लाभलेली असून, तिची आजी आणि बहीण या उत्तम अभिनेत्री राहिलेल्या आहेत. रियाला फाल्गुनी पाठक हिचे ‘याद पिया की आने लगी’ या गाण्यासाठी आजही ओळखले जाते. रियाने बॉलिवूडमध्ये ‘स्टाइल’ या चित्रपटातून एण्ट्री केली. मात्र बॉलिवूडमध्ये फारशा चित्रपटांमध्ये ती बघावयास मिळाली नाही. अभिनय, मॉडेलिंगबरोबर रिया उत्तम डान्सर आहे. तिचे कथक नृत्य खूपच पसंत केले जाते. रियाच्या बॉलिवूड प्रवासाबाबत बोलायचे झाल्यास खूपच कमी चित्रपटांमध्ये तिला अभिनयाची संधी मिळाली आहे. मात्र अशातही ती नेहमीच बॉलिवूडमधील चर्चेचे नाव राहिले आहे. सोशल मीडियावर तर ती नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रिया एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेली असता तिने वेटरला ‘सेक्स’ डिमांड केली होती. तिची ही डिमांड चांगलीच चर्चेत आली होती. आता तिचे नाव ‘बिग बॉस’सारख्या वादग्रस्त शोला जोडले गेल्यास ती पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.