रितविक थोडक्यात वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 16:39 IST
उत्तराखंडात नुकत्याच झालेल्या ढगफुटीतून रितविक धंजानी थोडक्यात वाचला. रितविक सध्या मॅन व्हर्सेस जॉब या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण उत्तराखंडात करत ...
रितविक थोडक्यात वाचला
उत्तराखंडात नुकत्याच झालेल्या ढगफुटीतून रितविक धंजानी थोडक्यात वाचला. रितविक सध्या मॅन व्हर्सेस जॉब या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण उत्तराखंडात करत आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत असताना रितविक असलेल्या ठिकाणापासून केवळ सात किमीच्या अंतरावर ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर दरड कोसळल्याने जवळजवळ तीन तास रितविक त्याच ठिकाणी अडकला होता. रितविक आणि त्याच्या टीमने तिथल्या काही लोकांची मदत घेऊन दगड बाजूला केले. आता सगळे काही आता व्यवस्थित झाले असून आपण सुरक्षित जागी लवकरच पोहोचू असे वाटत असतानाच त्यांच्यापासून केवळ 15 मीटरच्या अंतरावर दुसरी दरड कोसळली. हे पाहून आम्ही प्रचंड घाबरलेलो होतो. तिथे जवळपास राहात असलेल्या लोकांनी सुरक्षित स्थळी पोहोचण्याासठी आमची खूप मदत केली असे रितविक सांगतो.