Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितू शिवपुरीचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 14:08 IST

'इस प्यार को क्या नाम दू' या मालिकेच्या यशानंतर इस प्यार को क्या नाम दूँचा दुसरा भाग आला होता. ...

'इस प्यार को क्या नाम दू' या मालिकेच्या यशानंतर इस प्यार को क्या नाम दूँचा दुसरा भाग आला होता. पण पहिल्या भागात प्रेक्षकांना बरुण सोबती आणि सान्या इराणीची जोडी पाहायला मिळाली होती. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण दुसऱ्या सिझनमध्ये ही जोडी प्रेक्षकांना न दिसल्याने त्यांनी या मालिकेकडे पाठ फिरवली होती. आता प्रेक्षकांना या मालिकेचा तिसरा सिझन पाहायला मिळणार असून तिसऱ्या सिझनमध्ये बरुण सोबती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर शिवानी तोमर त्याच्या नायिकेची भूमिका बजावणार आहे. शिवानी तोमरच्या आईची भूमिका रितू शिवपुरी साकारणार आहे. या मालिकेत रितू खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा या मालिकेतील लूक हा खूप ग्लॅमरस असून तिच्या या आधीच्या चित्रपटांमधील लूकपेक्षा या मालिकेतील लूक खूपच वेगळा असणार आहे.हे तर झाले रिल लुक विषयी नुकतेच रितूने एक हटके ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. मालिकेत झळकण्यापूर्वीच रसिकांना थोडी वेगळी झलक पाहायला मिळावी म्हणूनच रितूने हे फोटोशूट केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षानंतप पुन्हा इंडस्ट्रीत परतत आहे.मालिकेत शिवानी तोमरच्या आईची भूमिका रितू शिवपुरी साकारणार आहे.रितू शिवपुरीने आँखे, हम सब चोर है, आर या पार, हद्द कर दी आपने, शक्तीः द पॉवर यांसारख्या नव्वदीच्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आँखे या चित्रपटातील रितूची गोविंदासोबतची जोडी चांगलीच गाजली होती. या चित्रपटातील रितूवर चित्रीत केले गेलेले लाल दुप्पटे वाली हे गाणे प्रेक्षकांना आजही स्मरणात आहे. रितूने 2006 साली काही मालिकांमध्ये काम केले आहे. पण दिवसातील 18-20 तास चित्रीकरण करणे तिला शक्य नव्हते. या सगळ्यामुळे तिला तिच्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हता म्हणून तिने काम बंद केले होते.