Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: अभी ना जाओ छोडकर...! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेशने वाहिली आशा भोसले यांना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 20:20 IST

ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच रितेशने आणि 'बिग बॉस मराठी ६'च्या टीमने दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली

'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. रितेश देशमुख या ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन करत आहे. ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच रितेशने आणि 'बिग बॉस मराठी ६'च्या टीमने दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नाही..., अशा शब्दांमध्ये रितेशने आशा भोसले यांची आठवण जागवली.याप्रसंगी 'बिग बॉस मराठी ६'चे सर्व स्पर्धक भावुक झालेले दिसले. रितेशने खास शब्दांमध्ये आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. आशा भोसले यांचं १२ एप्रिल रोजी निधन झालं. आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीतविश्वावर शोककळा पसरली. आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रितेश देशमुखही उपस्थित होता. त्यामुळे 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच रितेशने आशा भोसले यांना आदरांजली वाहून त्यांच्या संगीतकार्याचा गौरव केला. याशिवाय त्यांच्या कारकीर्दीला मानवंदना दिली.ग्रँड फिनालेला सुरुवात

रितेश देशमुख पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे 'बिग बॉस मराठी ६'च्या या ग्रँड फिनालेला अभिषेक बच्चन आणि जिनिलिया देशमुखही हजेरी लावणार आहे. रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचं प्रमोशन आज 'बिग बॉस मराठी ६'मध्ये होणार आहे. त्यानिमित्त अभिषेक आणि जिनिलिया 'बिग बॉस मराठी ६'च्या टॉप ५ स्पर्धकांशी गप्पा मारतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bigg Boss Marathi 6 Grand Finale: Riteish Pays Tribute to Bhosle

Web Summary : Riteish Deshmukh honored Asha Bhosle at the Bigg Boss Marathi 6 finale. The show featured emotional tributes and celebrated her musical legacy. Abhishek Bachchan and Genelia D'Souza attended for movie promotion.
टॅग्स :आशा भोसलेरितेश देशमुखबिग बॉस मराठी ६