Join us

रितेश देशमुख घेऊन येतोय धम्माल कॉमेडी शो, पाहा ‘Case Toh Banta Hai’चा धम्माल ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:55 IST

Case Toh Banta Hai Trailer : ‘केस तो बनता है’ असं या नव्या शोचं नाव आहे आणि आता या नव्या कॉमेडी शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Case Toh Banta Hai Trailer : रजत शर्मांचा ‘आप की अदालत’ हा शो तुम्हाला आठवत असेलच. आता याच धर्तीवरचा एक कॉमेडी शो तुमच्या आमच्या भेटीस येतोय. होय, अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि वरूण शर्मा  हा शो होस्ट करणार आहेत. शोमध्ये बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले दिसतील. त्यांच्यावर आरोप लागतील. पण हे आरोप गंभीर नाही तर धम्माल कॉमेडी असतील. रितेश सेलिब्रिटींवर विचित्र व अतरंगी आरोप करेल आणि वरूण शर्मा सेलिब्रिटींचा बचाव करताना दिसेल. ‘केस तो बनता है’ असं या नव्या शोचं नाव आहे आणि आता या नव्या कॉमेडी शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

या कॉमेडी रिअ‍ॅलिटी शोमध्ये करण जोहर, करिना कपूर, अनिल कपूर, रोहित शेट्टी, वरूण धवन, सारा अली खान, बादशाह असे अनेक सेलिब्रिटी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले दिसत आहेत. हे सगळे वकील बनलेल्या रितेशच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत.अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर हा नवा शो स्ट्रिम होणार आहे. खास बात म्हणजे, आठवड्यातून एकदा प्रसारित होणारा हा शो पाहण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागणार नाही. अ‍ॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शन असलेला हा शो तुम्ही अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर बघू शकाल. येत्या 29 जुलैपासून हा शो स्ट्रिम होतोय. आता हा शो प्रेक्षकांना किती आवडतो ते बघूच.

टॅग्स :रितेश देशमुखअ‍ॅमेझॉन