महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणच्या मंचावर रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर ठरले आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 16:44 IST
गेल्या वर्षभारापासून 'सैराट' फेम आर्ची आणि परश्याचाच बोलबाला पाहयला मिळतोय. जिथे जावे तिथे सगळीकडे आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि ...
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणच्या मंचावर रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर ठरले आकर्षण
गेल्या वर्षभारापासून 'सैराट' फेम आर्ची आणि परश्याचाच बोलबाला पाहयला मिळतोय. जिथे जावे तिथे सगळीकडे आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि परश्या अर्थात आकाश ठोसरचीच जादू पाहायला मिळतेय.विविध कार्यक्रमांमध्येही फक्त आर्ची आणि परश्या पाहायला मिळतायेत. त्यामुळे मराठीतल्या मानाचा पुरस्कार समजला जाणारा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?च्या मंचावरही हे दोघेच सगळ्यांचे आकर्षण ठरले.तसेच आपल्या अदाकारीने अख्या महाराष्ट्राला याड लावण-या रिंकु आणि परश्यावर वेगवगळ्या पुरस्कार देऊन कौतुकाचा वर्षावही करण्यात आला.यावेळी या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक पसंतीची मोहोर ‘सैराट’ चित्रपटावर उमटली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्काराचे मानकरी आकाश ठोसर व रिंकू राजगुरू ठरले.फेव्हरेट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार म्हणून आकाश ठोसर व नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार रिंकू राजगुरूने पटकावला. 'फेव्हरेट स्टाईल आयकॉन' म्हणून आकाश ठोसरला पुरस्कार देण्यात आला.‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ पुरस्कार अभिनेत्री रिंकू राजगुरूला देण्यात आला.तसेच या मंचावर रिकु राजगुरूची दिलखुलास अदा आणि आकाश ठोसर याचा रोमँटीक अंदाज आणि विविध परफॉर्मन्सनी या कार्यक्रमात रंगत आणली होती.यावेळी रिंकु राजगुरूच्या आणि आकाश ठोसरच्या परफॉर्मन्सने रसिकांनाही थिरकण्यास भाग पाडले.