सबसे बडा कलाकार या कार्यक्रमताील स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे रवीना टंडनला आली स्मिता पाटील यांची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 10:14 IST
सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात रवीना टंडन, अर्शद वारसी आणि बोमन इराणी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या मधील सगळ्याच ...
सबसे बडा कलाकार या कार्यक्रमताील स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे रवीना टंडनला आली स्मिता पाटील यांची आठवण
सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात रवीना टंडन, अर्शद वारसी आणि बोमन इराणी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या मधील सगळ्याच लहान मुलाचा परफॉर्मन्स हा नेहमीच दमदार असतो. ही सगळीच मुले खूपच चांगला अभिनय करतात. या कार्यक्रमातील स्पर्धक मनदीप आणि मंजिरी यांनी नुकताच एक परफॉर्मन्स सादर केला होता. या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले. अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या आय़ुष्याचा बिकट प्रवास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. सुधा चंद्रन या खूप चांगल्या नर्तिका होत्या. पण त्यांनी एका अपघातात त्यांचा पाय गमावला. त्या कधीच कोणत्याही आधाराशिवाय चालूदेखील शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्यांनी त्या परिस्थितीवर मात केली. त्यांनी खोटा पाय लावला आणि त्यावर त्या केवळ चालल्याच नाहीत तर त्यांनी पुन्हा नृत्य करायला सुरुवात केली. त्यांचा आयुष्यातील हाच प्रवास नुकताच सबसे बडा कलाकार या कार्यक्रमात मनदीप आणि मंजिरी यांनी लोकांसमोर त्यांच्या परफॉर्मन्सद्वारे मांडला. हा प्रवास ऐकून बोनम इराणी अतिशय भावुक झाले होते. रवीनालादेखील या दोघांचा परफॉर्मन्स खूप आवडला. मनदीप आणि मंजिरीचे कौतुक करताना रवीना म्हणाली, तुमच्या दोघांचा हा परफॉर्मन्स पाहाताना मला स्मिता पाटील यांची आठवण आली. तुम्ही दोघीही खूप चांगला अभिनय करता. तुमच्या अभिनयात मला अनेकवेळा स्मिता पाटील यांच्या अभिनयाचा भास होतो.मनदीप आणि मंजिरीचे एवढे कौतुक झाल्यानंतर त्या दोघीही खूपच खूश झाल्या होत्या. स्मिता पाटील या आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी त्यांच्या खूप कमी वर्षांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत.