रिमा आणि आर्शीनची जमली गट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 13:17 IST
नामकरण या मालिकेत आर्शीन अवनी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. आर्शीन वयाने खूपच छोटी असली तरी तिच्या अभिनयाचे कौतुक ...
रिमा आणि आर्शीनची जमली गट्टी
नामकरण या मालिकेत आर्शीन अवनी ही प्रमुख भूमिका साकारत आहे. आर्शीन वयाने खूपच छोटी असली तरी तिच्या अभिनयाचे कौतुक सगळेच करत आहे. या मालिकेत रिमा लागूदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. रिमा यांच्याकडून आर्शीन सध्या अभिनयाचे धडे घेत आहे. काही दिवसांपूर्वी एक दृश्य चित्रीत करताना काही केल्या या दृश्यात कशाप्रकारे अभिनय करायचा हे आर्शीनला जमत नव्हते. दिग्दर्शकांनीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरीदेखील कसा अभिनय करायचा हे कळतच नव्हते. त्यावेळी रिमा लागू यांनी तिला ते दृश्य समजवले आणि लगेचच तिने त्या दृश्यात खूप चांगला अभिनय केला. या मालिकेत आर्शीन आणि रिमा लागू या दोघांमध्ये मतभेद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत असले तरी खऱ्या आयुष्यात या दोघांची चांगलीच गट्टी जमली आहे. आर्शी सांगते, "मी रिमा लागू यांना माझी गुरू मानते. त्या मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. त्यांच्याकडून मला खूप काही शिकयला मिळत आहे. मोठी झाल्यावर त्यांच्यासारखी चांगली अभिनेत्री बनण्याची माझी इच्छा आहे."