Join us

​रिद्धिमा पंडित ‘डान्स चॅम्पियन्स’मध्ये करणार सहसूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 15:38 IST

स्टार प्लसवरील डान्स प्लस या कार्यक्रमाच्या यशानंतर रेमो डिसोझा डान्स चॅम्पियन्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. डान्स ...

स्टार प्लसवरील डान्स प्लस या कार्यक्रमाच्या यशानंतर रेमो डिसोझा डान्स चॅम्पियन्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. डान्स प्लस या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहाता या कार्यक्रमाला देखील प्रेक्षक डोक्यावर घेतील अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. डान्स चॅम्पियन्स या कार्यक्रमात खूप चांगले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात अन्य वाहिन्यांवरील नृत्यविषयक कार्यक्रमात विजयी ठरलेल्या स्पर्धकांना उपविजेते ठरलेले डान्सर आव्हान देणार आहेत. या कार्यक्रमात रेमो डिसुझा प्रेक्षकांना सुपरजजच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघव जुयाल करणार असून त्याने या आधी डान्स प्लस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्याचे हे सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. त्याच्यासोबत आता आणखी एक कलाकार आपल्याला डान्स चॅम्पियन्सचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.हमारी बहू हमारी रजनी_कांत या मालिकेमुळे नावारूपाला आलेली रिद्धिमा पंडित देखील राघवसोबत या कार्यक्रमात सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी रिद्धिमा सांगते, “मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करत आहे. त्यानंतर मी अभिनयाच्या क्षेत्रात उतरले. आता मी पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत शिरणार असल्याबद्दल मला प्रचंड आनंद होत आहे. ‘डान्स चॅम्पियन्स’सारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यास मला नक्कीच आवडेल. मी बरेच नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रम न चुकता बघत असते आणि मला ते फार आवडतात. सूत्रसंचालनाबद्दल मी पूर्वी काही कार्यशाळांमध्ये भाग घेतला होता. परंतु माझी खरी तयारी आरशासमोर उभी राहूनच होत असते. ती मी अगदी काळजीपूर्वक करत असते. माझ्यातील हरहुन्नरीपण आणि राघवची सूत्रसंचालनाची वैशिष्ट्य़पूर्ण शैली यामुळे आम्ही प्रेक्षकांना एक आगळा अनुभव देऊ शकू, याची मला खात्री आहे.”काल्पनिक मालिका तसेच वास्तववादी कार्यक्रमांमध्ये रिद्धिमा पंडित हा एक ओळखीचा चेहरा आहे. तिने विविध ब्रॅण्डच्या उत्पादनांसाठी मॉडेल म्हणून कारकीर्दीला प्रारंभ केला आणि नंतर नाटकांमधून भूमिका रंगविल्या. सध्या ती ‘द ड्रामा कंपनी’त काम करत आहे.Also Read : ​बिर राधा शेप्रा ठरला डान्स प्लस ३चा विजेता, विजेतेपद समर्पित केले या खास व्यक्तींना