Join us
Daily Top 2Weekly Top 5

​उतरण फेम मृणाल जैनसोबतच्या नात्याबाबत वर्षा भगवानीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 17:38 IST

मृणाल जैन उतरण या मालिकेमुळे नावारूपाला आला. नुकताच तो नागार्जुन एक योद्धा या मालिकेत झळकला होता. त्याच्या खाजगी आयुष्यातील ...

मृणाल जैन उतरण या मालिकेमुळे नावारूपाला आला. नुकताच तो नागार्जुन एक योद्धा या मालिकेत झळकला होता. त्याच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टी काही महिन्यांपूर्वी चांगल्याच गाजल्या होत्या. वर्षा भगवानी या अभिनेत्रीने मृणाल जैनवर अनेक आरोप लावले होते. मृणालने त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेऊन वर्षाशी लग्न करण्याचे तिला वचन दिले होते. पत्नीशी घटस्फोट घेतोय असे सांगून त्याने तिच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वर्षाने पोलिसांकडे त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. पण तिच्या कुटुंबियांमुळे तिने ही तक्रार मागे घेतली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वर्षाने त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. ती सांगते, तीन वर्षांपूर्वी मृणालने त्याच्या कुटुंबियांमुळे स्वीटीसोबत लग्न केले. स्वीटीला मी घटस्फोट देणार असे तो मला सतत सांगत होतो. तो मला त्याबाबतीत फसवतच होता असे मला वाटते. कारण त्याने मला सांगितले होते की, माझ्या भावाचे लग्न झाल्याशिवाय मी स्वीटीला घटस्फोट देऊ शकत नाही. कारण यामुळे घरात ताणतणाव निर्माण होऊ शकतो. तसेच तो स्वीटीसोबत खूश नाहीये असे म्हणत अनेकवेळा रडायचा. माझ्यासोबत शारीरिक नाते त्याला प्रस्थापित करायचे होते. पण स्वीटीसोबत घटस्फोट घे आणि त्यानंतरच माझ्याकडे ये असे मी त्याला सुनावले होते. मी ही गोष्ट त्याच्या पत्नीच्या कानावर देखील घातली होती. त्याने एकदा माझ्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मी त्याच्याशी बोलणे बंद केले. हे देखील त्याच्या पत्नीला मी सांगितले होते. त्यावर ती त्याला सोडून गेली होती. स्वीटी निघून गेल्याने त्याने मलाच सुनावले होते.