Join us

रियुनियन तो बनता है

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:00 IST

 खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचा काही महिन्यांपूर्वी सातवा सिझन झाला. या कार्यक्रमाचा सहावा सिझन होऊन काही वर्षं झाली आहेत. ...

 खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचा काही महिन्यांपूर्वी सातवा सिझन झाला. या कार्यक्रमाचा सहावा सिझन होऊन काही वर्षं झाली आहेत. तरी आजही या सिझनमधील सगळेच स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात आहेत. या सिझनच्या सगळ्या कलाकारांनी नुकतेच एक रियुनियन केले. या कार्यक्रमाचे सगळे स्पर्धक नुकतेच हुसैन खुजारेवालाच्या घरी एकत्र जमले होते. या सिझनमध्ये रितविक धंजानी नसला तरीही त्याने या रियुनियनला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर रितविकने गितार वाजवत तर मयांग चँगने गाणे गाऊन या रियुनियला चार चाँद लावले.