Join us

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत येणार 'हा' ट्वीस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:55 IST

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' रंजक वळणामुळेच रसिकांची आवडती मालिका बनली आहे. त्यानुसार मालिकेत रसिकांना ...

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' रंजक वळणामुळेच रसिकांची आवडती मालिका बनली आहे. त्यानुसार मालिकेत रसिकांना लवकरच एक मोठा ट्वीस्ट बघायला मिळणार आहे.या मालिकेत गोएंका कुटुंबियांना समजते की नायराला (शिवांगी जोशी) गर्भवती राहण्यात काही अडचणी आहेत.मालिकेच्या सध्याच्या कथानकानुसार, कार्तिक (मोहसिन खान) आणि नायरा (कायरा) हे एका त्याग केलेल्या अनाथ बाळाला घरी आणतात आणि त्याची स्वत:च्या मुलाप्रमाणेच काळजी घेऊ लागतात.या बाळाचे संगोपन करताना त्यांना जाणवते की त्यांना स्वत:चेही मूल असावे.पण या इच्छेमुळेच नायरा गर्भवती राहू शकत नाही, ही गोष्ट त्यांना समजते. यासंदर्भात शिवांगी जोशी म्हणाली, “नव्या जीवाला जन्म देणं हे स्त्रीला मिळालेलं सर्वात मोठं वरदान असून कोणत्याही स्त्रीला मातृत्त्वापासून वंचित राहावं लागू नये,असं मला वाटतं. मातृत्त्व हा कोणत्याही स्त्रीच्या जीवनातील एक सुंदर टप्पा असतो.”असेही शिवांगी जोशीने सांगितले.मालिकेत आता लवकरच रंजक वळण रसिकांना पाहता येणार आहे.कार्तिक आणि नायरा हे आता पालक बनण्याचा टप्पा गाठण्यास सज्ज झाले आहेत.जोडप्यातील खटकेबाजी, नंतर पार पडलेला भव्य विवाहसोहळा तसेच त्यानंतरचे या दोघांचे प्रेमजीवन यांचे साक्षीदार असलेले या जोडप्याचे लक्षावधी चाहते आता ते पालक कधी बनताहेत,त्याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत.त्यांची अर्थातच निराशा होणार नाही.कायराने एका अनाथ बालकाला आपल्या घरी आणले असून कीर्ती (मोहेनाकुमारी) हिला दिवस गेल्याचे समजताच तेही आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याच्या निर्णयापर्यंत येतील.त्यामुळे आगामी भागात हा ट्रॅक पाहणे अधिक रंजक ठरणा आहे.छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.2 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे.नुकतंच या मालिकेनं अडीच हजार भागपूर्ण केले आहेत.केवळ सर्वात जास्त काळ सुरु असलेली मालिकाच नाही तर या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.हा रेकॉर्ड झाल्यानं ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खुश होती.'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेला छोट्या पडद्यावर सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेकडून टक्कर मिळत आहे.दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत.