Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ये रिश्ता क्या कहलाता है फेम रोहन मेहरा सांगतोय कांची सिंगसोबत सध्या तरी लग्नाचा विचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 12:15 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत रोहन मेहराने काम केले होते. या मालिकेत त्याने नक्ष ही भूमिका साकारली ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत रोहन मेहराने काम केले होते. या मालिकेत त्याने नक्ष ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. याच मालिकेतील कांची सिंगसोबत त्याचे कित्येक महिन्यांपासून अफेअर सुरू आहे. ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत होत्या. पण आम्ही सध्या तरी लग्न करण्याचा काहीही विचार केला नसल्याचे रोहन सांगतो. सध्या तरी त्याला त्याच्या करियरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आणखी चार वर्षं तरी तो लग्न करणार नाहीयेरोहन मेहराने ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका अचानक सोडली होती आणि तो बिग बॉस या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून गेला होता. या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण सध्या तो कोणतेच नवीन प्रोजेक्ट स्वीकारत नाहीये. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले आहे की, मी ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेत तर बिग बॉस या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा भाग होतो. त्यामुळे भविष्यातदेखील मी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचाच भाग असणार आहे. मी भविष्यात भूमिका चोखंदळपणे निवडण्याचे ठरवले आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे रोहनला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यामुळे बिग बॉसनंतर तो पुन्हा ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेकडे वळेल असे सगळ्यांना वाटले होते. पण त्याने तसे केले नाही. याउटल सध्या ही मालिकाच मी पाहात नाही. तसेच मला मागे वळून पाहाण्याची सवय नाहीये असे त्याने म्हटले आहे. मी याआधी दोन चित्रपटात काम केले असल्याने सध्या मी चित्रपटांवरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असल्याचे तो सांगतो.