Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर येणार रेखा आणि शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:01 IST

बॉलिवूडची सदाबहार सौंदर्यवती तारका रेखा आणि पार्श्वगायक शान हे लवकरच आपल्या ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर आलेले दिसणार आहेत.

ठळक मुद्देबादशहाच्या ‘मर्सी’ या सुपरहिट गाण्यावर रेखा यांनी नृत्य केले

बॉलिवूडची सदाबहार सौंदर्यवती तारका रेखा आणि पार्श्वगायक शान हे लवकरच आपल्या ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर आलेले दिसणार आहेत.  रेखा यांचे सौंदर्य शालीनता आणि शानच्या  आवाजाची जादू यामुळे हा भाग पाहताना प्रेक्षकांना दुहेरी आनंद मिळेल. शानने यावेळी टॉप-8 स्पर्धकांबरोबरही काही गाणी गायली. शान आणि रेखा यांनी स्पर्धकांशी संवाद साधला आणि त्यांच्याबरोबर नृत्यही केले. शानने गाणे गात असतानाच रेखा  या मंचावर प्रवेश करणार आहेत.  

बादशहाच्या ‘मर्सी’ या सुपरहिट गाण्यावर त्यांनी जे नृत्य केले ते पाहताना प्रेक्षकांचे भानच हरपले. या भागावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शान म्हणाला, “या कार्यक्रमातील सर्व स्पर्धक अतिशय गुणी असून या मंचावर मी व्यतीत केलेला प्रत्येक क्षण मी खूप उपभोगला. मी या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग पाहिले असून त्यामुळे यातील काही स्पर्धक माझ्या ओळखीचे होते. जगाच्या विविध भागांतून आलेल्या या गुणी स्पर्धकांबरोबर गाणी गातानाचा अनुभव फारच अप्रतिम होता.  हिंदी संगीताला जागतिक स्तरावर सन्मान देणारा हा एकमेव कर्यक्रम असून मला जर संधी मिळाली, तरमी नक्कीच या कार्यक्रमात पुन्हा सहभागी होईन.” ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

 

टॅग्स :रेखा