Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखा आणि जितेंद्र एकत्र आले ह्या कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 07:15 IST

गतकाळातील जोडी रेखा आणि जितेंद्र यांनी त्यांच्या प्रेम तपस्या, एक ही भूल, जुदाई आणि अशा २० हून अधिक चित्रपटांमधून लाखों चाहत्यांची मने जिंकली आहेत.

ठळक मुद्देडान्स+ ४ फिनालेमध्ये एकत्र दिसणार रेखा आणि जितेंद्र

गतकाळातील जोडी रेखा आणि जितेंद्र यांनी त्यांच्या प्रेम तपस्या, एक ही भूल, जुदाई आणि अशा २० हून अधिक चित्रपटांमधून लाखों चाहत्यांची मने जिंकली आहेत. ते डान्स+ ४ फिनालेमध्ये एकत्र दिसणार आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, “फिनालेमध्ये सेगमेंट्‌स असतील आणि त्यापैकी एक असेल नॉस्टालजिया. त्यात रेखा आणि जितेंद्र हे परीक्षक असणार आहेत. स्पर्धक ह्या जोडीच्या हिट गाण्यांवर परफॉर्म करताना दिसतील. रेखाजी आणि जीतूजीसुद्धा मंचावर थिरकताना पाहायला मिळणार आहेत. ह्या दोन्ही महान कलाकारांना डान्स प्लस ४च्या मंचावर पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी निव्वळ पर्वणी असेल.” जितेंद्र हे अनिल कपूर यांच्यासोबत यापूर्वी डान्स प्लस ४ मध्ये श्रीदेवी स्पेशल एपिसोडमध्ये आधी आले आहेत. त्यांना ह्या शोमधील कला अतिशय आवडली होती आणि त्यामुळे ते आता रेखाजींसोबत पुन्हाएकदा ह्या शोमध्ये स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी आणि फिनालेचा हिस्सा बनण्यासाठी येत आहेत.

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचा सुपरजज्ज रेमो डिसुझा याच्या ‘एनी बडी कॅन डान्स’ या नृत्यविषयक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेला नृत्यदिग्दर्शक आणि नर्तक प्रभुदेवा तसेच नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य हे दोघे नुकतेच या कार्यक्रमात सेलिब्रिटी अतिथी म्हणून उपस्थित होते. या भागात रेमो डिसुझाच्या ‘एनी बडी कॅन डान्स’ (एबीसीडी) या चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार एकत्र आले होते. विख्यात नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा, रेमो, गणेश आचार्य ‘डान्स+4’ या कार्यक्रमात परीक्षक (कॅप्टन्स) म्हणून काम पाहणारे धर्मेश, पुनित, शक्तिमोहन वगैरे सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाल्याने हा कार्यक्रम म्हणजे या चित्रपटातील कलाकारांचे जणू पुनर्भेट संमेलनच (रियुनियन) ठरले. या सर्वांनी यावेळी ‘एबीसीडी’ चित्रपटातील ‘रत्ती पत्ती’ या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट नृत्य सादर केले.

टॅग्स :डान्स प्लस 4रेखाजितेंद्र