Join us

मालिकेसाठी दिला चित्रपटाला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:35 IST

शिल्पा तुळसकर सध्या जाना ना दिल से दूर या मालिकेत सुजाता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. शिल्पा या मालिकेत एका ...

शिल्पा तुळसकर सध्या जाना ना दिल से दूर या मालिकेत सुजाता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. शिल्पा या मालिकेत एका मुलाच्या आईच्या भूमिकेत असली तरी तिची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची आहे. शिल्पाने हिंदी मालिकांसोबतच मराठी चित्रपटातही अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  तिला काही दिवसांपूर्वी एका मराठी चित्रपटाची ऑफर आली होती. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असून या चित्रपटाची कथा खूपच चांगली होती. शिल्पाला भेटून निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत चर्चाही केली होती. पण सध्या शिल्पाने केवळ मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असल्याने तिने मराठी चित्रपट करण्यास नकार दिला.