Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये 'गीथा गोविंदम' चित्रपटातील हा सीन केला रिक्रिएट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 2:23 PM

मालिकांमध्ये बऱ्याचदाच हिंदी चित्रपटातील गाजलेले सीन रिक्रिएट केलेले पहायला मिळतात.

मालिकांमध्ये बऱ्याचदाच हिंदी चित्रपटातील गाजलेले सीन रिक्रिएट केलेले पहायला मिळतात. असेच काहीसे स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेत पहायला मिळाले. साऊथचा सुपरहिट चित्रपट गीथा गोविंदममधील येनती येनती गाण्यातील सीन मालिकेत रिक्रिएट केलेला पहायला मिळाला आणि मालिकेतील या सीनला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. गौरी आणि जयदीपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. 

गीथा गोविंदम चित्रपटातील येनती येनती या गाण्यातील साउथचा अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा गाडीतला हा सीन सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत रिक्रिएट करण्यात आला आहे.

गौरीचे जयदीपवर किती प्रेम आहे हे तर आपल्याला माहित आहे. त्यामुळे जयदीपला गाडीत झोपलेलं पाहून गौरीला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही आणि ती गुपचूप सेल्फी काढते. इतकेच नाही तर गालावर किस करायला जाते अन् जयदीपला जाग येते. हा जयदीप-गौरीचा हा सीन सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. 

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावतेय. सध्या मालिकेत रंजक वळण आले आहे. ते म्हणजे जयदीप आणि गौरीच्या लग्नामुळे नाराज झालेल्या माईंचीही आता गौरीवरील नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे एकीकडे पुन्हा एकदा शिर्के पाटील कुटुंबात सुख नांदताना दिसतंय तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीमध्येही हळूहळू प्रेम फुलताना दिसते आहे.

तसेच आता अंबाबाईच्या उत्सवात जोडपे शर्यतीत सहभाग घेताना दिसणार आहेत. जे जोडपे जिंकेल त्याच्या हस्ते देवीची पूजा करण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे हा मान कोणाला मिळतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह