Join us

बालिकावधूने बनवला रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 13:50 IST

बालविवाहावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बालिकावधू या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीपासूच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील आनंदी, जग्या, दादीसा या ...

बालविवाहावर प्रकाशझोत टाकणाऱ्या बालिकावधू या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीपासूच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील आनंदी, जग्या, दादीसा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेने आता लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागा बनवली आहे. या मालिकेचे नुकतेच २००० भाग पूर्ण झाले. हिंदी मालिकांमध्ये सगळ्यात जास्त दिवस सुरू असलेली मालिका म्हणून बालिकावधूची नोंद करण्यात आली आहे.