Join us  

​शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर केला हा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 9:43 AM

शिल्पा शिंदे सध्या बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉस ११ च्या विजेतेपदाची ती दावेदार मानली जात आहे. शिल्पा शिंदे ...

शिल्पा शिंदे सध्या बिग बॉसच्या घरात आहे. बिग बॉस ११ च्या विजेतेपदाची ती दावेदार मानली जात आहे. शिल्पा शिंदे बिग बॉसच्या घरात गेल्यापासून खूपच चांगला खेळ खेळत आहे. कधी ती कोणत्या स्पर्धकासोबत भांडताना दिसत आहे तर कधी ती एखाद्या स्पर्धकाला खूप मदत करत असल्याचे दिसत आहे. बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यापासूनच विकास गुप्ता आणि तिची भांडणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिल्पा शिंदेला बिग बॉस या कार्यक्रमाचा चांगलाच फायदा झाला आहे. या कार्यक्रमामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. या कार्यक्रमामुळे तिने सोशल मीडियावर नुकताच एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शिल्पा शिंदे बिग बॉसची विजेती ठरावी असे तिच्या अनेक फॅन्सना वाटत आहे आणि त्यामुळेच ते सोशल मीडियावर तिला पाठिंबा देत आहेत. काही दिवसांपूर्वी वुई लव्ह शिल्पा शिंदे असा हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने अनेक ट्वीट केले होते. तिच्या फॅन्सने केलेल्या ट्वीटची संख्या एक दक्षलक्षाहून देखील जास्त आहे आणि त्यामुळेच वुई लव्ह शिल्पा शिंदे हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडिंग मध्ये आला आहे. शिल्पा या पूर्वी देखील ट्विटरच्या ट्रेडिंग मध्ये आली होती. पण या वेळी तिच्या ट्विटरची संख्या ही दक्षलक्षाहून जास्त आहे. कोणताही टिव्ही कलाकार इतक्या ट्वीटमुळे ट्रेंडिंग मध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचमुळे शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर एक रेकॉर्ड रचला आहे. शिल्पा शिंदेने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने भाभाजी घर पर है या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. शिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है या मालिकेत अंगुरी भाभीची व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तिची बोलण्याची ढब तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. पण या मालिकेच्या निर्मात्यांसोबत झालेल्या भांडणामुळे शिल्पाने ही मालिका सोडली. आता या मालिकेत शुभांगी अत्रे प्रेक्षकांना अंगुरी भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. Also Read : शिल्पा शिंदेवर अश्लील जोक करणाऱ्या राजू श्रीवास्तवला यूजर्सनी सुनावले; मागावी लागली माफी!!