Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे नेहा पेंडसे परतणार नाही बिग बॉसच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 08:00 IST

नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन्सने ट्विटरवर ब्रिंग बॅक नेहा हे कॅम्पेन सुरू केले होते. नेहाला मिळालेला हा प्रतिसाद पाहाता बिग बॉसने तिच्या रिएंट्रीचा विचार देखील केला होता असे म्हटले जाते.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या यंदाच्या म्हणजेच १२व्या सिझनमध्ये प्रेक्षकांना नेहा पेंडसेला पाहायला मिळाले होते. नेहाने आजवर मराठी, दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ती नुकतीच जॉनी लिव्हरसोबत पार्टनर्स या मालिकेत देखील झळकली होती. नेहा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने ती बिग बॉसच्या घरात असताना तिला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण नुकतेच नेहाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. पण आता ती या कार्यक्रमात पुन्हा एकदा प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण आता ती बिग बॉसच्या घरात परतणार नाहीये अशी जोरदार चर्चा आहे.

नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन्सने ट्विटरवर ब्रिंग बॅक नेहा हे कॅम्पेन सुरू केले होते. नेहाला मिळालेला हा प्रतिसाद पाहाता बिग बॉसने तिच्या रिएंट्रीचा विचार देखील केला होता असे म्हटले जाते. पण आता नेहाने कार्यक्रमात परत येण्यासाठी अधिक पैशांची मागणी केली आहे आणि ही रक्कम देण्यास बिग बॉसच्या टीमने मनाई केली असल्याने ती घरात परतणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

नेहा बिग बॉसच्या घरात परत जाणार हे पक्कं ठरलेले होते. पण त्याचवेळी नेहाला एक प्रसिद्ध दागिन्याच्या कंपनीकडून जाहिरातीची ऑफर आली. तिला या कंपनीने फोटो शूट आणि प्रिंटमधील जाहिरातीसाठी खूपच चांगली रक्कम देण्याचे कबूल केले होते. नेहाला या ज्वेलरी ब्रँडसाठी लगेचच फोटोशूट करायचे होते. नेहाला बिग बॉस आणि ही जाहिरात अशा दोन्ही ऑफर असल्याने ती चांगलीच द्विधा मनस्थितीत अडकली होती. त्यामुळे नेहाने याबाबत बिग बॉसच्या टीमला सांगितले. ज्वेलरी ब्रँडसाठी जाहिरात केल्यानंतर मिळणारे पैसे बिग बॉसच्या टीमने तिला द्यावेत अशी तिने बिग बॉसच्या टीमला मागणी केली होती. पण ही रक्कम खूपच जास्त असल्याने बिग बॉसच्या टीमने यासाठी नकार दिला असे म्हटले जात आहे. 

टॅग्स :बिग बॉस 12नेहा पेंडसे