Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे पिया अलबेलामधील शीन दासने अक्षय म्हात्रेची फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 15:09 IST

ये है आशिकी, सिलसिला प्यार का यांसारख्या मालिकांमध्ये शीना दासने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पण पिया अलबेला या मालिकेत ...

ये है आशिकी, सिलसिला प्यार का यांसारख्या मालिकांमध्ये शीना दासने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पण पिया अलबेला या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या या मालिकेबाबत आणि तिच्या या क्षेत्रातील पदार्पणाविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...शीना तुझा अभिनयप्रवास कसा सुरू झाला?मी मुळची दिल्लीची आहे. मी मास मीडियाचे शिक्षण घेतले असून एका इंग्रजी वाहिनीमध्ये मी एन्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून इंटर्नशिप करत होती. पण मला आधीपासूनच अभिनयक्षेत्रात जायचे होते. त्यामुळे मी हे क्षेत्र सोडून अभिनयक्षेत्रात लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मी दिल्लीत एका स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा मी जिंकली आणि मुंबईत आली. मुंबईत आल्यावर मी अनेक ऑडिशन्स दिल्या आणि त्यातून मला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या.एक स्ट्रग्लर म्हणून काम मिळवणे किती कठीण असते असे तुला वाटते?ज्यावेळी तुम्ही कलाकार असता त्यावेळी ऑडिशन हा तुमच्या कामाचाच एक भाग असतो. ऑडिशन देण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नसतो असे मला वाटते. मी मुंबईत आल्यानंतर अगणित ऑडिशन्स दिली आहेत. मी अनेक महिने ऑडिशन देतच होती. पण कोणत्याही गोष्टीला योग्य वेळ देणे गरजेचे असते असे मला वाटते. मी संयम दाखवल्यामुळेच खूप चांगली संधी माझ्याकडे चालून आली. त्याचदरम्यान मी काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. मला पहिलीच मालिका राजश्री प्रोडक्शनची मिळाली असल्याने मी खूप खूश आहे. या मालिकेच्या ऑडिशनच्यावेळी सुरुवातीला मी ऑडिशनचा व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर मला अनेकवेळा ऑडिशन्ससाठी बोलावण्यात आले आणि त्यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली. या मालिकेचे तुम्ही नुकतेच ऋषिकेशमध्ये चित्रीकरण केले. चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा होता?मी दिल्लीमध्ये राहाणारी असल्याने मी अनेकवेळा ऋषिकेशला आली आहे. मी माझ्या आई वडिलांना कधी म्हणाली की, मला समुद्र किनारी फिरायला जायचे आहे तर मला ते सांगायचे आपण गोव्याला जाऊया आणि ते मला ऋषिकेषला घेऊन यायचे. त्यामुळे इथल्या अनेक जागा मी पाहिल्या आहेत. पण चित्रीकरण करत असताना अनुभव खूप वेगळा होता. पहाटेच्या थंडीत आम्ही गंगेच्या पाण्यात चित्रीकरण केले आहे. तू आणि अक्षय गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरण करत आहात, तुमची केमिस्ट्री कशी जमून आली आहे?मी ऑडिशनला आली त्यावेळीच अक्षय तिथे होता. नरेन या भूमिकेसाठी त्याची खूप आधीच निवड झाली होती. ऑडिशनच्यावेळी मी त्याला भेटली. ऑडिशनला शेवटच्या पाच मुलींमध्ये माझी निवड झाली होती. पाच मुलींमधून मला निवडले जाणार याची अक्षयला कल्पना असल्याने त्याने मला फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण आता मालिकेच्या सेटवर भेटल्यानंतर आमची चांगली गट्टी जमली आहे. आम्ही दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनलो आहोत.