Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या कारणामुळे मॉनी रॉय झाली इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 15:38 IST

मॉनी रॉय नुकतीच खूप इमोशनल झाली असून तिचे इमोशन होण्याचे कारण सोशल मीडियाच्या द्वारे तिने तिच्या फॅन्सना सांगितले आहे.

नागिन या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. या मालिकेचा दुसरा सिझनही लोकांनी डोक्यावर घेतला. आता या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या दोन्ही सिझनमध्ये मॉनी रॉय नागिनच्या भूमिकेत दिसली होती. पण आता तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना मॉनी रॉयला पाहायला मिळणार नाही. तिसऱ्या सिझनमधये मॉनी रॉयची जागा अनिता हसनंदानी आणि सुरभी ज्योती यांनी घेतली आहे. नागिन या मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये मॉनी रॉय मुख्य भूमिकेत नसणार असल्याने तिचे फॅन्स तिला मिस करणार आहेत. पण त्याचसोबत मॉनी देखील तिच्या नागिन या मालिकेला मिस करत आहे. तिने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर या मालिकेच्या चित्रीकरणाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच काही व्हिडिओ देखील तिने पोस्ट केले आहेत. यासोबत तिने एक खूप छान कॅप्शन दिले आहे. तिने कॅप्शनद्वारे एकता कपूरचे आभार देखील मानले आहेत. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, काही मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी छोट्या गोष्टींपासून दूर जावे लागते. नागिन या मालिकेशी मी खूप अटॅच होती. मालिकेतील शिवन्या आणि शिवांगी या दोन्ही भूमिकांनी मला खूप काही शिकवले. मी नागिन या मालिकेच्या पुढच्या सिझनसाठी खूप उत्सुक आहे. मी या मालिकेची आतुरतेने वाट पाहात असून या मालिकेच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या नागिनवर जेवढे प्रेक्षकांनी प्रेम केले, तेवढेच ते नवीन नागिनवर देखील करतील याची मला खात्री आहे. मॉनी रॉयने छोट्या पडद्यावर आजवर खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेपासून तिने तिच्या करियरला सुरुवात केली. आता ती गोल्ड चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.  Also Read : मॉनी रॉय नव्हे तर आता या अभिनेत्री असणार नव्या नागिन