Join us

या कारणामुळे मोनालिसा करते गायत्री मंत्राचा जप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 16:51 IST

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ ही अमनवी शक्तींवरील मालिका असून त्यातील डायन आपल्या दुष्ट शक्ती आणि वाईट नजरेने राठोड कुटुंबियांवर कशी संकटे आणते, हे यात दाखवण्यात येणार आहे.

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ ही अमनवी शक्तींवरील मालिका असून त्यातील डायन आपल्या दुष्ट शक्ती आणि वाईट नजरेने राठोड कुटुंबियांवर कशी संकटे आणते, हे यात दाखवण्यात येणार आहे.

यात चेटकीण मोहनाची भूमिका अभिनेत्री मोनालिसा हिने सांगितले, “मी प्रथमच खलनायिकेची भूमिका रंगवीत असून ती वास्तववादी वाटावी, यासाठी या भूमिकेवर मी बरंच संशोधन केलं आहे. नजरच्या चित्रीकरणास प्रारंभ झाल्यापासून मी रोज रात्री गायत्री मंत्राचा जप करू लागले आहे. मी तशी भित्र्या स्वभावाची आहे. पण या मालिकेत मी एका चेटकीणीची भूमिका साकारीत असून सेटवर मी सतत भयाण पार्श्वसंगीत ऐकत असते. त्या आठवणींमुळे मला रात्रीच्या वेळी भीती वाटते. या भूमिकेत मी इतकी गुंतले आहे की चेटकीणीच्या या नकारात्मक शक्तींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मी रात्री गायत्री मंत्र जपू लागले आहे. त्या मंत्रामुळे माझ्या मनात शुध्द आणि सकारात्मक विचार येऊ लागतात आणि मग मला चांगली झोप लागते. इतकंच नव्हे, तर या मंत्रामुळे मला दुसऱ्या दिवशीच्या माझ्या कामावर मन चांगलं एकाग्रही करता येऊ लागलं आहे.

मोनालिसाला एका नव्या रूपात आणि आपल्या सौंदर्याने ती या भूमिकेला खमंग फोडणी कशी देते, ते प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नजर या मालिकेत मोनालिसा सोबतच स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. या मालिकेचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.