Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणासाठी करण पटलेने मानले चाहत्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:30 IST

ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. डिसेंबर 2013 पासून सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि पाच वर्षानंतर मालिका इतकिच लोकप्रिय आहे.

ठळक मुद्देअभिनेता करण पटेल याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘स्टार प्लस’वरील ‘ये है मोहब्बतें’ या लोकप्रिय मालिकेला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. डिसेंबर 2013 पासून सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि पाच वर्षानंतर मालिका इतकिच लोकप्रिय आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. 

ये है मोहब्बतें यशस्वी 5 वर्षे साजरी करण्यासाठी मालिकेचे सर्व कर्मचारी आणि कलाकार एकत्र आले होते. मालिकेच्या अर्ध दशकपूर्तीमुळे सर्व कलाकार आनंदित झाले होते आणि यापुढेही आणखी नवे विक्रम करण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली होती. या काळात त्यांना ज्यांनी मदत केली आणि प्रेम दिले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. मालिकेत रमणची भूमिका रंगविणारा अभिनेता करण पटेल याने आपल्या चाहत्यांचे आभार मानताना म्हटले, “प्रेक्षकांनी या मालिकेला दिलेला उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. ” 

या यशस्वी टप्प्यामुळे सर्व कलाकार उत्साहित झाले होते. त्यांनी या मालिकेच्या यशाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले. चाहत्यांचे प्रेम यापुढेही या मालिकेवर असेच कायम राहो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ये है मोहब्बतें