Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे दिया और बाती हम मालिकेतील भाभोला करायचीय कॉमेडी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 16:59 IST

निलू वाघेला म्हणजेच सगळ्यांची लाडकी भाभो.दिया और बाती हम या मालिकेतील भाभोने रसिकांना आपल्या खास अंदाजात रसिकांचे फुल ऑन ...

निलू वाघेला म्हणजेच सगळ्यांची लाडकी भाभो.दिया और बाती हम या मालिकेतील भाभोने रसिकांना आपल्या खास अंदाजात रसिकांचे फुल ऑन मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा दिया और बाती मालिकेचा दुसरा सिझन ‘तू सूरज मैं सांज पिया जी’  या मालिकेत भाभो रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र भाभोलाही त्यांच्या भूमिकेत वेगळेपण हवे आहे.नुकचेच दिलेल्या मुलाखतीत भाभोला आता कॉमेडी भूमिकाही साकराण्याची इच्छा असल्याचे सांगितले. नच बलिये या कार्यक्रमात डान्सिंग अंदाज रसिकांना पाहयला मिळाला होता. या शोमुळे त्यांच्या कौशल्या रसिकांनाही जाणून घेता आले. त्यामुळे आता साचेबध्द पध्दतीतील भूमिकेक्षा कॉमेडीकडेही वळायचा भाभोचा प्रयत्न असणार असल्याचेही सांगितले. सध्या तू सूरज मै सांज पिया जी मालिकेत सासूची भूमिका साकरताना भाभो दिसणार असली तरीही या मालिकेव्यतिरिक्तही कॉमेडी करताना भाभो दिसली तर आश्चर्य वाटायला नको. कारण कलाकरांनाही त्यांच्या विविध छटा रसिकांपर्यंत पोहचण्यात उत्साह वाटतो. त्याचप्रमाणे ते सतत त्यांच्या कामात नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे भविष्यात जर ऑफर आल्या कर त्या कॉमेडी भूमिकांच्या ऑफर्स स्विकारणार असल्याचे नीलू वाघेलाने म्हटले आहे. ‘तू सूरज मैं सांज पिया जी’ नव्या सीझनमध्ये एक प्रमुख  करण्यात आला आहे. आधीच्या सीझनमध्ये या मालिकेची कथा ही राजस्थानवर आधारित होती.मालिकेचा बॅकड्रॉप बदलला असून आता या मालिकेची कथा निसर्गसुंदर अशा केरळमध्ये रंगणार आहे. मालिकेचे शुटिंगही केरळमध्येच होणार आहे. दिया और बाती हम ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं. त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिया और बाती या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता.मालिका अशी अचानक बंद झाल्याने रसिकांमध्येही नाराजी होती. या मालिकेच लोकप्रियता बघता पुन्हा याच मालिकेचा सिक्वेल आणण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आता भाभो नव्य कुटुंबासह ‘तू सूरज मैं सांज पिया जी’  या मालिकेच्या माध्यामातून एक नवा अध्याय सुरु करणार आहे.