Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस-१४' मध्ये स्पर्धकाचा संपणार प्रवास, तर पाहायला मिळणार एक मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 13:03 IST

'बिग बॉस १४' शोमध्ये आधी आलेले वाईल्ड कार्ड स्पर्धक आणि आता येणारे वाइल्ड कार्ड स्पर्धक आगामी काळात आपल्या रंजक खेळीने कितपत रसिकांचे मनोरंजन करतात हेच पाहणे रंजक असणार आहे.

'बिग बॉस 'या रियालिटी शोने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. पहिल्या सीझनपासून ते १४ व्या  सीझनदेखील रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. पहिल्या सीझनच्या स्पर्धकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. यानंतर या सीझनमधील स्पर्धकांना विविध ऑफर्स मिळू लागल्या. त्यामुळेच या शोच्या प्रत्येक सीझनची उत्कंठा शिगेला पोहोचते. 

पुन्हा एकदा बिग बॉस 14 मध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण यंदाच्या एपिसोडमध्ये घरातील एका सदस्याचा प्रवास संपणार आहे.नुकतीच शोमध्ये विकास गुप्ताची पुन्हा एन्ट्री झाल्याने चाहतेही खुश आहेत.  पण त्याच्या आगमनानंतर घरातील एक स्ट्रॉग कंटेस्टंट समजला जाणारा मनु पंजाबीची मात्र बिग बॉसच्या घरातून एक्झिट होणार आहे.

मनु पंजाबीच्या चाहत्यांसाठी ही बातमी थोडीफार निराशाजनक नक्कीच असणार. मनूची तब्येत खराब असल्याचे कारण देत त्याला शोमधून एक्झिट घ्यावी लागणार असल्याची चर्चा आहे. 

मनुच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.  पायांच्या उपचारासाठी मनुला शो सोडावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. पण बरे झाल्यानंतर मनु शोमध्ये एन्ट्री घेऊ शकेल का ?  यावर अजुनतरी कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे विकास गुप्तानेही शोमध्ये एंट्री करत धमाल उडवली आहे. विकास गुप्ताची एंट्रीने मात्र अर्शी खानचा टफ टाइम सुरू झाला आहे. 

 बिग बॉसने अलीकडेच विकासला घरातून काढले होते. अर्शीने विकासच्या आईबद्दल काहीतरी उलट- सुलट बोलले होते. त्यांचा हा वाद इतका टोकाला गेला की, विकास गुप्ताला शिक्षा म्हणून काही दिवस हा शो सोडावा लागला होता. एकीकडे विकासची एंट्री तर दुसरीकडे मनुच्या एक्झिटने सध्या घरात कभी खुशी- कभी गम असेच वातावरण निर्माण झाले आहे. 

यांत आणखीन रंजक तडका देण्यासाठी  शोमध्ये  वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. तो कंटेस्टंट असणार आहे सोनाली फोगट.सध्या या बातमीवर कोणत्याही प्रकराचे स्पष्टीकरण शोकडून देण्यात आलेले नाही. आधी आलेले वाईल्ड कार्ड स्पर्धक आणि आता येणारे वाइल्ड कार्ड स्पर्धक आगामी काळात आपल्या रंजक खेळीने कितपत रसिकांचे मनोरंजन करतात हेच पाहणे रंजक असणार आहे.

टॅग्स :बिग बॉस १४अर्शी खान