या कारणामुळे आलियाला इतरांसह या गोष्टींची चर्चा करायला आवडत नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 09:52 IST
cnxoldfiles/a>आलिया भटची आई सोनी राझदानने या कार्यक्रमात अनपेक्षित हजेरी लावून आलिया भटला आश्चर्याचा धक्का दिला. आईला या कार्यक्रमात सहभागी ...
या कारणामुळे आलियाला इतरांसह या गोष्टींची चर्चा करायला आवडत नाही?
cnxoldfiles/a>आलिया भटची आई सोनी राझदानने या कार्यक्रमात अनपेक्षित हजेरी लावून आलिया भटला आश्चर्याचा धक्का दिला. आईला या कार्यक्रमात सहभागी झालेली पाहून आलियाने धावत जाऊन तिचे स्वागत करताना तिला घट्ट मिठी मारली.आलिया म्हणाली, “मी माझ्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी या कार्यक्रमात आले होते.पण कोणत्याही टीव्ही कार्यक्रमात आज प्रथमच माझी आई माझ्याबरोबर सहभागी झाली आहे. हा फारच गोड आनंदाचा धक्का होता. त्याबद्दल सर्वांचे आभार.” सर्वच स्पर्धकांच्या पालकांनी आपल्या मुला-मुलाच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. पण सोनी राझदान आपली मुलगी आलिया भटच्या बालपणाबद्दल काय सांगते, हे ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. सोनी राझदान म्हणाल्या, “आलियाचा जन्म होणं आणि तिला पहिल्यांदाच मी हातात धरलं, तो क्षण हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता.आलिया मनाने खूप उदार आणि दयाळू आहे, ही आलियाची सर्वात चांगली बाजू आहे.पण ती जेव्हा खूप तणावाखाली असते किंवा अडचणीत असते,तेव्हा ती या गोष्टी इतरांना सांगत नाही, ही तिची गोष्ट मला आवडत नाही. ती नेहमीच सांगते, “ममा, माझ्यापुढे काही समस्या आहे, पण ती मीच सोडवीन.” ती अनेकदा खूप रडते आणि नंतर तो प्रश्न सोडवतेही.पण त्यावर उघडपणे मला काही सांगत नाही.”आलियाच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी ऐकून आणि कामाबद्दल तिची प्रामाणिकता पाहून स्पर्धक आणि परीक्षकांसह उपस्थित श्रोत्यांनीही तिचे खूप कौतुक केले.