Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिअल लाइफमध्ये इतकी ग्लॅमरस दिसते छोट्या पडद्यावरची 'अम्माजी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 11:19 IST

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जुन्या मालिका बंद होत नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांमध्ये जुन्या हिट ठरलेल्या ...

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जुन्या मालिका बंद होत नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांमध्ये जुन्या हिट ठरलेल्या मालिका पुन्हा सुरू होत नव्या ढंगात छोट्या पडद्यावर दाखल होणा-या मालिकाही आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी हिट ठरलेल्या मालिका त्यांची लोकप्रियताही अमाप होती.तिच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी पुन्हा जुन्या मालिका सिक्वेलच्या रूपात किंवा मग सिझन 2च्या रूपात सुरू होत आहेत.सध्या 'ना आना इस देस... लाडो' या जुन्या मालिकेचा आता दुसरा सिझन रसिकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये नताशा शर्मा  मुख्य भूमिकेत झळकली होती तर या दुस-या सिझनमध्ये 'बालिका वधू' फेम अविका गौर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.या मालिकेपूर्वी अविका 'ससुराल सिमर का' मालिकेत झळकली होती.अविका व्यतिरक्त अद्विक महाजन,कंवर ढिल्लन आणि शशांक व्यास हे कलाकारही या मालिकेत झळकणार आहेत.विशेष म्हणजे मालिकेत शशांक व्यासने 'बालिका वधू' मालिकेत मोठ्या जग्याची भूमिका साकारली होती. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून शशांक व्यास आणि अविका गौर यांचा नवा अंदाज काय कमाल करणार हे पाहणे रंजक असणार आहे. मालिकेतील या कलाकारांची चर्चा हो असताना मालिकेची 'अम्मा' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मेघना मलिकनेही रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.मालिकेचा प्रोमो टीव्हीवर झळकताच रसिकांच्या डोळ्यासमोर आधीच्या अम्माची आठवण रसिकांना होते.कारण,पहिल्या सिझनमध्ये मेघनाने साकारलेली अम्मा नेगिटीव्ह शेडची होती.याउलट नव्या सिझनमध्ये अम्माचा कोणता अंदाज रसिकांना पाहायला मिळणार याची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय.मालिकेत अम्माचा पोशाखपासून ते तिचे चालणे बोलण्याचा लहेजा या सगळ्या गोष्टी यावेळीही पूर्वीसारख्याच आहेत.सध्या ऑनस्क्रीन देसी अंदाजात दिसणारी ही अम्मा रिअल लाइफमध्ये मात्र खूप ग्लॅमरस आहे.तिचे रिअल लाइफ फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरतायेत.अगदीच हॉट पँट पासून ते मिनी स्कर्टमध्ये,वनपिसमध्ये असलेले तिचे ग्लॅमरस फोटो पाहता मेघना रिअल लाइफमध्येही खूप स्टायलिश असल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे ऑनस्क्रिन दिसणार अंदाज आणि रिअल लाइफ अंदाज खूप वेगळा असला तरीही मेघनाचे हे ग्लॅमरस फोटो पाहून रसिकांच्या चाहत्यांमध्ये वाढ होणार हे मात्र नक्की.येत्या 7 तारखेपासून 'ना आना अस देस लाडो 2' सुरु होणार असून रसिकांच्या पसंतीस कितपत पात्र ठरते  ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.