Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाचा बिग बॉस मराठी फेम ​ऋतुजा देशमुख काय सांगतेय तिच्या कार्यक्रमातील कमबॅकविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 13:26 IST

ऋतुजा देशमुख बिग बॉस मराठी कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण या कार्यक्रमाच्या एका टास्क दरम्यान तिला दुखापत झाली ...

ऋतुजा देशमुख बिग बॉस मराठी कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण या कार्यक्रमाच्या एका टास्क दरम्यान तिला दुखापत झाली असल्याने तिला या कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले. बिग बॉस मराठीतील एका टास्क दरम्यान ऋतुजाचा हात फ्रॅक्चर झाला होता. तिच्या हातावर उपचार करण्यासाठी तिला घरातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्याचवेळी ऋतुजाचा हात बरा झाल्यानंतर ती घरात पुन्हा येऊ शकते असे तिला सांगण्यात आले होते. ऋतुजाच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. ऋतुजाच्या हाताचे प्लास्टर काढण्यात आले असून तिचा हात पूर्णपणे बरा झाला आहे.ऋतुजानेच सोशल मीडियाच्या द्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.ऋतुजाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून तिच्या हाताचे प्लास्टर काढले असल्याचे त्यात दिसत आहे. ती बिग बॉस मराठीच्या घरात जायला पूर्णपणे फिट आहे असे या व्हिडिओद्वारे आपल्याला कळत आहे. त्याचसोबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांशी गप्पा देखील मारल्या. ऋतुजाने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली असून त्यात म्हटले आहे की, मी आता पूर्णपणे फिट असून कार्यक्रमात पुन्हा जाण्यास सज्ज झाली आहे. पण माझी पुन्हा एंट्री कधी असणार याविषयी मला अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाहीये. मी ज्यावेळी घरातून बाहेर आली, त्याचवेळी मला सांगण्यात आले होते की, मला पूर्णपणे बरे वाटल्यावर मी घरात पुन्हा जाऊ शकेन. मला घरात असतानाच दुखापत झाली होती आणि त्यातही माझी पूर्णपणे चुकी नव्हती. कोणीतरी टास्क सुरू असताना माझा पाय खेचला आणि त्याचमुळे मी माझ्या हातावर पडली. त्यामुळेच माझा हात फ्रॅक्चर झाला होता. पण ही गोष्ट कार्यक्रमात दाखवण्यात आली नाही. तो भाग एडिट करण्यात आला. ऋतुजा देशमुखचा बिग बॉस मराठीच्या घरातील वावर प्रेक्षकांना खूप आवडत होता. ती या कार्यक्रमाच्या फायनलपर्यंत धडक मारेल असे प्रेक्षकांना वाटत असतानाच दुखापतीमुळे ती बाहेर पडली. ऋतुजा या कार्यक्रमात परतेल आणि सगळ्यांना तगडे आव्हान देईल असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. Also Read : ​‘सेल्फी’ची विदेश भरारी