Join us

रवी जाधव यांचा हटके लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 18:47 IST

हटके लूक व वेगळया अंदाजाची चर्चा आपण नेहमीच एखादया हिरो किवा हिरोइनची ऐकत असतो. या या अभिनेत्याने न्यू लूक ...

हटके लूक व वेगळया अंदाजाची चर्चा आपण नेहमीच एखादया हिरो किवा हिरोइनची ऐकत असतो. या या अभिनेत्याने न्यू लूक बनविला आहे, ही हेअरस्टाइल केली आहे अशा देखील बातम्या नेहमीच झळकत असतात. पण ज्यावेळी मराठी इंडस्ट्रीत एखादा दिग्दर्शक न्यू लूक बनवितो त्यावेळी खरचं आश्चर्य वाटते. मराठी इंडस्ट्रीचे लाडके दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपला हटके लूक सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या दिग्दर्शकाने मराठी इंडस्ट्रीला टाइमपास, नटरंग, बालगंधर्व, बालक-पालक यासारखे सुपर-डुपर हिट चित्रपट दिले आहे. यासारखा दिग्गज कलाकाराच लूक देखील लय भारी आहे. डोक्यावर हॅट, चष्मा,थोडी व्हाइट कलरची दाढी,ब्लू शर्ट, हातात वॉच अशा हटक्या लूकमध्ये मात्र दिग्दर्शक रवी जाधव सध्या सोशलमिडीयावर चमकतना दिसत आहे.