Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रात्रीस खेळ चाले’ पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 18:34 IST

याआधी देखील झी मराठीने प्रेक्षकांसाठी अनेक अविस्मरणीय मालिका सादर केल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले.' अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले होते

ठळक मुद्दे कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे

झी मराठी ही फक्त एक वाहिनी राहिली नसून ती प्रत्येक घरातील एक अविभाज्य घटक झाली आहे आहे. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते. या वाहिनीवरील प्रत्येक कार्यक्रम प्रेक्षक मनोभावे बघतात. ‘लागिरं झालं जी’, 'तुला पाहते रे' असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नव-याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आलेले 'कानाला खडा' आणि 'झिंग झिंग झिंगाट' प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.

याआधी देखील झी मराठीने प्रेक्षकांसाठी अनेक अविस्मरणीय मालिका सादर केल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले.' अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले होते. या मालिकेतला नाईकांचा वाडा पाहायला आजही लोकांची गर्दी होत असते. कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर म्हणजे ही मालिके आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या रहस्यमय म्युझिकवर एक गूढ टिझर प्रसारित झाला, तसंच हा टिझर झी मराठीच्या सोशल मीडियावर देखील पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिघेला पोहोचली आहे. मालिकेचं कथानक काय असेल, सर्व पात्र तीच असतील का? पुन्हा एकदा तोच वाडा पाहायला मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील.

टॅग्स :झी मराठी