Join us

'रेती' हा माझ्यासाठी उत्साह आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 09:16 IST

गुढीपाडवा हा सण आपल्या मातीतला सण असून या दिवसापासून नवीन वषार्ची सुरूवात होेते. आणि आज या सणाच्या निमित्ताने माझ्या ...

गुढीपाडवा हा सण आपल्या मातीतला सण असून या दिवसापासून नवीन वषार्ची सुरूवात होेते. आणि आज या सणाच्या निमित्ताने माझ्या नवीन वर्षाची सुरूवात दिमाखात होत आहे. आमच्याच मातीत तयार झालेला 'रेती' या माझ्या मराठी चित्रपटाच्या रिलीजने  ही नवीन वर्ष सुरू होत असल्याने माझा उत्साह डबल झाला असल्याचे अभिनेत्री गायत्री सोहम हिने लोकमत सीएएक्सशी बोलताना सांगितले. तसेच तिने आपल्या चाहत्यांसाठी  संदेश दिला आहे की, खूप छान मोठी स्वप्न पाहा, ती पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न करा. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी मन लावून त्या गोष्टीचा ध्यास घ्या. परंतु ती गोष्ट मिळविताना आपण दिशाहीन होत नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. चला, तर गायत्रीला देखील लोकमत सीएनक्सच्यावतीन गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.