Join us

'या' सिनेमात दिसणार रसिका सुनील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 07:15 IST

अवधूत गुप्ते प्रस्तुत व यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमात रसिका सुनील प्रमुख भूमिका दिसणार आहे.

ठळक मुद्दे'गॅटमॅट' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

'शनाया' या सुप्रसिद्ध कॅरेक्टरमुळे अभिनेत्री रसिका सुनील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिचा चाहता वर्गदेखील खूप मोठा असून, त्यांना आवरणं प्रोडक्शन टीमसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत होते. निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित आगामी 'गॅटमॅट' सिनेमाच्या सेटवर तिच्या चाहत्यांनी संपूर्ण युनिटला असंच भरपूर हैराण करून सोडलं होतं. रसिकाला बघण्यासाठी तिचे चाहते सेटवर बांधण्यात आलेली उंच सुरक्षा भिंतदेखील ओलांडून येत होते. सेटवरील कडक बंदोबस्तामुळे तिच्यापर्यंत पोहोचणे अगर शक्य झाले नाही तर, मोबाईलवरून तिचा गुपचूप फोटो किंवा व्हिडियो काढण्याचा प्रयत्न हि मंडळी करत असे. अशाप्रकारे, एेन चित्रीकरणादरम्यान होत असलेल्या चाहत्यांच्या घुसखोरीमुळे सेटवरील कामं बऱ्याचदा खोळंबलीदेखील होती.  अवधूत गुप्ते प्रस्तुत व यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' या सिनेमात रसिकाची प्रमुख भूमिका असून, लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणारे 'गॅटमॅट' सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा टीझर तरुणवर्गाच्या पसंतीलादेखील उतरला होता. 

रसिका फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी सध्या न्युयॉर्कला गेली आहे. रसिकाने 'माझ्या नवऱ्याची बायको'  मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण होते. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावला होता. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया पसंतीस पात्र ठरली.  

टॅग्स :रसिका सुनिल