Join us

रश्मी-नंदीश वेगळे होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:22 IST

घटस्फोट घेण्याविषयी दोघांचेही एकमत झाले असून लवकरच ते एकमेकांपासून वेगळे होतील. गेल्या वर्षभरापासून रश्मी देसाई आणि नंदीश संधू हे ...

घटस्फोट घेण्याविषयी दोघांचेही एकमत झाले असून लवकरच ते एकमेकांपासून वेगळे होतील. गेल्या वर्षभरापासून रश्मी देसाई आणि नंदीश संधू हे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगली होती. अखेर स्वत: रश्मीने या बातमीला दुजोरा देताना, ही गोष्ट खरी असल्याचे सांगितले. टेलिव्हिजनवरील 'उतरन' या मालिकेमुळे रश्मी आणि नंदीशची जोडी लोकप्रिय झाली होती, त्यानंतर 2012 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. मात्र, काहीच दिवसांत दोघांमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. नंदीशचा मुलींच्याबाबतीतला मोकळाढाकळा स्वभाव रश्मीसाठी चिंतेचे कारण ठरत होता, तर रश्मीचा गरजेपेक्षा संवेदनशीलपणा नंदीशसाठी डोकेदुखी ठरत होता.