Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रश्मीने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:22 IST

सलमान खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटावर आधारित संघर्ष ही मालिका लवकरच ...

सलमान खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटावर आधारित संघर्ष ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला, जस्मिन भसीन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रश्मी देसाईदेखील आता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत रश्मी साकारत असलेली भूमिका ही अतिशय सशक्त असल्याने या भूमिकेसाठी ऐश्वर्या सखुजा, क्रितिका कार्मा, छावी पांडे, टिना दत्ता, संजीदा शेख यांसारख्या अनेक अभिनेत्रींचा विचार करण्यात आला होता. पण या सगळ्यांमध्ये रश्मीने बाजी मारली. रश्मी लवकरच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.