Join us

'उतरन' फेम रश्मि देसाई का झालीय नाराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 17:48 IST

सध्या रश्मि देसाई झालीय नाराज इतक्या छोट्याशा गोष्टींला घेवून लोकं इतकी चर्चा का करतात. त्याचे झाले असे की रश्मि ...

सध्या रश्मि देसाई झालीय नाराज इतक्या छोट्याशा गोष्टींला घेवून लोकं इतकी चर्चा का करतात. त्याचे झाले असे की रश्मि देसाईचा तिच्या सहकलाकार लक्ष्य लालवाणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरला झालाय. हा फोटो खुद्द रश्मिनेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला अपलोड केलाय. फोटो पहाताच तिच्याबद्दल उलट सुलट चर्चा होत आहेत. रश्मि आणि लक्ष्य यांच्यात अफेअर सुरू असल्याचे चर्चा आहेत. हे ऐकताच रश्मिला नाराज झालीय. फक्त एक फोटो काय शेअर केला तर त्याच्यावर एवढी उलट सुलट चर्चा का करतायेत. एका फोटोमुळे तिचा राग तिला अनावर झालायया गोष्टीला घेवून रश्मि म्हणते, उगाच कोणत्याही गोष्टीला हव्या त्या गोष्टीत मोडू नका लक्ष्य माझा चांगला मित्र आहे. यापलीकडे आमचे कोणतेही नाते नाही. उगाच टीका करणे थांबवा ही अशोभनीय गोष्ट आहे. रश्मि आणि लक्ष्य दोघांनी एक अधुरी कहानी मालिकेत एकत्र कामही केले आहे.तसेच रश्मिने टीव्ही अभिनेता नंदीश संधुबरोबर लग्न केले होते. मात्र या नंदीशबरोबरही तिचे बिसल्याने दोघेही घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहेत.नेमके सत्य काय आहे योग्य वेळ आल्यावरच कळेल. तुर्तास लक्ष्य आणि रश्मि दोघेही फक्त चांगले मित्र आहेत असे मानण्यास हरकत नाही.