Join us

रश्मी देसाई पुन्हा पडली प्रेमात? अभिनेत्रीने मिस्ट्री मॅनसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:32 IST

Rashmi Desai : सध्या अभिनेत्री रश्मी देसाई सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. पण अलीकडेच अभिनेत्रीने एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

 'उतरन' (Utran) मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रश्मी देसाई(Rashmi Desai)ला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. रश्मीने आपल्या करिअरमध्ये बऱ्याच लोकप्रिय मालिकेत काम केले. तिला रिअॅलिटी शो बिग बॉस १३मधून खूप लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने सिद्धार्थ शुक्लासोबतची भांडणं आणि अरहान खानसोबतच्या अफेयरमुळे खूप चर्चेत आली होती. रश्मी देसाई लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी तिचे विवाहित आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे.

आजकाल रश्मी देसाई कोणत्याही टीव्ही मालिकेत दिसत नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 'उतरन' फेम अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्यही बरेच वादात सापडले आहे. एकेकाळी रश्मी देसाईने तिचा माजी प्रियकर आणि पती नंदिश संधूसोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेत राहिली होती. सध्या अभिनेत्री सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. पण अलीकडेच अभिनेत्री रश्मी देसाईने असा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे की, या व्हिडिओमध्ये दिसणारा मिस्ट्री मॅन कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

या व्हिडिओमध्ये रश्मी एका व्यक्तीसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीसोबत दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून कोरिओग्राफर सुभ्रनिल पॉल आहे. रश्मी आणि सुभ्रानील पॉल फक्त चांगले मित्र आहेत आणि दोघेही या व्हिडिओमध्ये डान्स करत आहेत. रश्मी देसाईचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली की अभिनेत्री या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे की आणखी काही... पण रश्मी आणि सुभ्रानील खूप चांगले मित्र आहेत, यापेक्षा जास्त काही नाही. मात्र, रश्मीकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. 

रश्मीचं लव्हलाइफ आलं होतं चर्चेत

रश्मी देसाई तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. रश्मीच्या आयुष्यात नंदिश संधूचा पहिला प्रवेश होता. दोघांनी १२ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले. मात्र, अवघ्या चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर रश्मीचे नाव लक्ष्य लालवानीसोबत जोडले गेले. मात्र, रश्मीची आई या नात्यावर खूश नव्हती. त्यानंतर रश्मीचे नाव सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडले गेले. पण हे नातेही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. यानंतर रश्मीही अरहान खानच्या प्रेमात पडली. पण 'बिग बॉस १३'मध्ये तिला अचानक अरहानच्या वास्तवाबद्दल कळालं आणि मग हे नातंही तुटलं. आज रश्मी देसाई सिंगल आहे आणि सिंगल आयुष्य एन्जॉय करत आहे. 

टॅग्स :रश्मी देसाई