Join us
Daily Top 2Weekly Top 5

माघी गणेशोत्सवानिमित 'बिग बॉस'मध्येही मंगलमय वातावरण, राकेशने रेखाटलं बाप्पाचं सुंदर चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:28 IST

राकेश बापट हा केवळ अभिनेताच नाही, तर तो एक उत्तम चित्रकार आणि शिल्पकार देखील आहे.

आपल्या शांत स्वभावासाठी आणि कलात्मकतेसाठी ओळखला जाणारा अभिनेता राकेश बापट त्याच्या कलेमुळे चर्चेत आला आहे. सध्या तो बिग बॉस मराठी ६ मध्ये दिसत आहे. णाज माघी गणेशोत्सव असताना राकेशने घरात एका कागदावर पेनाने गणेशाचे सुंदर चित्र रेखाटले आहे. त्याच्या या कलेने केवळ घरातील स्पर्धकांनाच नाही, तर प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केले आहे.

राकेश बापट हा केवळ अभिनेताच नाही, तर तो एक उत्तम चित्रकार आणि शिल्पकार देखील आहे. दरवर्षी तो स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती साकारतो, हे त्याच्या चाहत्यांना माहीतच आहे. मात्र, बिग बॉसच्या बंदिस्त घरात मर्यादित साधने उपलब्ध असतानाही त्याने ज्या तन्मयतेने गणपतीचे चित्र रेखाटले ते पाहून त्याच्यातील खऱ्या कलाकाराचे दर्शन घडले. चित्रातील बारकावे आणि त्यामागची त्याची श्रद्धा त्याच्या प्रत्येक स्ट्रोकमधून स्पष्टपणे जाणवत होती. राकेशने साकारलेले हे चित्र पाहून घरातील इतर स्पर्धकांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

अनेकदा वादावादी आणि तणावाचे वातावरण असलेल्या या घरात बाप्पाच्या चित्राच्या निमित्ताने एक सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही राकेशच्या या पेंटिंगचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, नेटकरी त्याच्या टॅलेंटचे तोंडभरून कौतुक करत आहेत. "कलाकाराची कला कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढते," अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे.

दरम्यान राकेश बापट आणि अनुश्री मानेच्या भांडणामुळे बिग बॉसची जोरदार चर्चा आहे. अनुश्रीने राकेशवर गंभीर आरोप केला आहे. राकेशने तिला परवानगी न घेतला हाताने खेचून उठवलं असं ती म्हणत आहे. तर इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये अशा प्रकारचा आरोप कधीच झाला नाही म्हणत राकेशने राग व्यक्त केला आहे. इंडस्ट्रीतून अनेकांनी राकेशची बाजू घेतली आहे. येत्या वीकेंडला भाऊचा धक्क्यावर रितेश अनुश्रीला काय बोलतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raqesh Bapat's Ganesha art brings festive cheer to Bigg Boss.

Web Summary : Raqesh Bapat, known for his artistry, created a Ganesha drawing in the Bigg Boss house for Maghi Ganeshotsav. His artwork impressed fellow contestants and viewers alike, showcasing his talent and devotion despite limited resources. The drawing brought positivity to the house.
टॅग्स :राकेश बापटबिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनमाघी गणेश जयंती