Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड? आरसीबी-मुंबई IPL सामन्यात ट्विनिंगमध्ये दिसलं कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:11 IST

रणवीर अलाहाबादियाने आरसीबी-मुंबई IPL सामन्यात "मी गर्लफ्रेंडसोबत आलो आहे" असं म्हणत रिलेशनशिप केलं कन्फर्म

Ranveer Allahbadia GF Juhi Bhatt : प्रसिद्ध पॉडकास्टर आणि यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया  सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर कोणाला डेट करतोय, यावर चर्चा रंगल्या होत्या. अखेर रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान रणवीरने आपल्या लेडी लव्हसोबत हजेरी लावली.

वानखेडे स्टेडियमवर प्रवेश करताना रणवीर आणि त्याची गर्लफ्रेंड जुही भट्ट पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. विशेष म्हणजे दोघांनीही 'ट्विनिंग' केलं होतं. पांढरा टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये हे जोडपे अतिशय सुंदर दिसत होते. यावेळी एक चाहता सेल्फी घेण्यासाठी जवळ आला असता, रणवीरने अतिशय स्पष्टपणे "मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत आहे" असे म्हणत आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.

कोण आहे जुही भट्ट?

रणवीरला क्लिन बोल्ड करणारी जुही भट्ट एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मूळची देहरादूनची असलेली जुही तिच्या फॅशन आणि लाईफस्टाईल कंटेंटसाठी ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे मोठे फॅन फॉलोइंग असून तिने अनेक नामांकित ब्रँड्ससोबत काम केले आहे. जुही भट्टच्या आधी रणवीरचे नाव टीव्ही अभिनेत्री निक्की शर्मासोबत जोडले गेले होते. मात्र, ते नाते फार काळ चालले नाही. 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरने यापूर्वी सांगितलं होतं की, वाद सुरू होण्याच्या काही काळ आधीच त्याचं टीव्ही अभिनेत्री निक्की शर्मा हिच्यासोबत ब्रेकअप झालं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Allahbadia Reveals Girlfriend Juhi Bhatt at IPL Match

Web Summary : YouTuber Ranveer Allahbadia publicly acknowledged his relationship with Juhi Bhatt at the RCB-Mumbai IPL match. The couple, sporting matching outfits, were photographed at Wankhede Stadium. Juhi is a social media influencer known for fashion and lifestyle content.
टॅग्स :रणवीर अलाहाबादिया