Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील राधा आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची सख्खी जाऊ, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 07:00 IST

फार कमी लोकांना माहित आहे की पौर्णिमा तळवळकरची जाऊबाईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'रंग माझा वेगळा' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील राधा म्हणजेच पौर्णिमा तळवळकर हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. होणार सून मी या घरची ही झी मराठीवरील मालिका काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजली होती. यात पौर्णिमा तळवळकर हिने श्री म्हणजेच शशांक केतकर याच्या आत्याची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये बेबी आत्या या नावाने तिने काम केले होते. यानंतर स्टार प्रवाहवर रंग माझा वेगळामध्ये दीपाच्या आईच्या भूमिकेत पौर्णिमा काम करत आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की पौर्णिमा तळवळकरची जाऊबाईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माझा होशील ना मालिकेतील सई बिराजदारची आई शर्मिला शशिकांत म्हणजेच सुलेखा तळवळकर  ही पौर्णिमाची जाव आहे.

शोभना तळवळकर व स्मिता तळवळकर या सख्ख्या जावा आहेत. सुलेखाची सासू स्मिता तळवळकर आहे, तर पौर्णिमाची सासू शोभना तळवळकर आहे.

तसेच पौर्णिमाची सख्खी धाकटी बहिण पल्लवी वैद्य ही आहे. या दोघींनी २२ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दुरावा या मालिकेत एकत्र काम केले होते.

दुरावा या मालिकेत या दोघींची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. यानंतर कोणत्याही मालिकेत दोघी एकत्र काम करताना दिसली नाही.