Join us

रंग माझा वेगळा: दिपाने तोडली सौंदर्यासोबतची सगळी नाती; सौंदर्याचं सत्य येणार समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 14:12 IST

Rang maza wegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिच्या दुसऱ्या मुलीविषयी म्हणजे दिपिकाविषयीचं सत्य कळणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla)  या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. हळूहळू या मालिकेत दिपिका आणि कार्तिकी यांना त्यांच्या खऱ्या आई-वडिलांविषयी कळू लागलं आहे. यामध्येच आता दिपिका आपलीच लेक असल्याचं दिपाला कळणार आहे. विशेष म्हणजे सौंदर्यानेच दिपिकाला आपल्यापासून वेगळं केल्याचं सत्य दिपाला समजणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाला तिच्या दुसऱ्या मुलीविषयी म्हणजे दिपिकाविषयीचं सत्य कळणार आहे. दिपिका लहान असतानाच सौंदर्या तिला हॉस्पिटलमधून घेऊन जाते हे दिपाला कळतं. त्यामुळे दुखावलेली दिपा सौंदर्याला जाब विचारते. इतकंच नाही तर, सौंदर्याने केलेल्या या कृत्यामुळे ती तिच्यासोबत असलेले सगळे नातेसंबंध तोडून टाकते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कार्तिकीला कार्तिकच आपले वडील असल्याचं सत्य कळतं. त्यानंतर, दिपाला, दिपिकाविषयीचं सत्य कळावं यासाठी सौंदर्याचं पुढाकार घेते. मात्र, यामध्ये दिपाचा गैरसमज वाढतो आणि त्यातूनच ती सौंदर्यासोबतचे नाते तोडते. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे