Join us

'रंग माझा वेगळा' फेम अनघाचं हॉटेल व्यवसायात पदार्पण, नावही ठेवलं 'खास', हे आहे लोकेशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:30 IST

अनघा आता व्यावसाय क्षेत्रात पाऊल ठेवत असून ती लवकरच स्वत:च एक हॉटेल सुरु करत आहे.

स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा'  मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणारी श्वेता अर्थात अनघा भगरे घराघरात पोहचली. अनघा भगरेचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. आज गणेशोत्सवानिमित्त अनघाने एक मोठी घोषणा केली आहे. 

अनघा आता व्यावसाय क्षेत्रात पाऊल ठेवत असून ती लवकरच स्वत:च एक हॉटेल सुरु करत आहे. ही एक खास गूडन्यूजने तिने आज चाहत्यांना दिली. 'वदनी कवळ' असे तिच्या हॉटलचे नाव आहे. फोटो शेअर करत अनघा कॅप्शनमध्ये लिहलं की,

" वक्रतुण्ड महाकायसूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देवसर्वकार्येषु सर्वदा ॥

असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए , “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोड़ी जागा निर्माण करायचं ठरवलयं! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण". In the heart of Pune, Deccan. लवकरच येतयं तुमच्या भेटीला. खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे. ।।गणपती बाप्पा मोरया।।". तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनी अनघाला नव्या व्यवसायासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

अनघा अतुल भगरे  ही भगरे गुरुजींची कन्या आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. अनघाचा जन्म 24 जून 19994 रोजी नाशिकमध्ये झाला. तिला लहानपणापासून अभिनयाची तसेच मॉडलिंगची आवड होती. तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. शिवाय, अनघाने प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून काम केले आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताव्यवसायहॉटेलसेलिब्रिटी