Join us

'रंग माझा वेगळा' रंजक वळणावर, अखेर श्वेताचं कारस्थान होणार उघड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 18:10 IST

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' रंजक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' रंजक वळणावर आली आहे. एकीकडे सुजयने दीपाच्या मुली त्याच्या असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दीपा ईनामदारांचे घर सोडले आहे तर दुसरीकडे आयशाने ती कार्तिकपासून प्रेग्नेंट असल्याचे म्हटले आहे. कार्तिक कधीच बाप बनू शकत असल्यामुळे तो आयशाचे म्हणणे नाकारतो. मात्र सौंदर्या आणि दीपा कार्तिकला फर्टिलिटी टेस्टसाठी तयार करतात. त्यामुळे आता कार्तिक इनफर्टाइल नसून तो बाप बनू शकतो, हे सत्य समोर येणार आहे. श्वेताने काही वर्षांपूर्वी केलेले हे कारस्थान सर्वांसमोर येणार का, हे पाहावे लागेल.

रंग माझा वेगळा मालिकेच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, सौंदर्या यावेळी कार्तिकची फर्टिलिटी टेस्टमध्ये कोणी कारस्थान करणार नाही, यासाठी खबरदारी घेते. त्यामुळे श्वेतादेखील हतबल होऊन जाते. त्यात राधा आई दीपाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. पण, सौंदर्याला कळलं तर त्या आपल्याला आणि श्वेता खूप मोठी शिक्षा देतील या भीतीने काहीच सांगत नाही.

दरम्यान आता  रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात पाहायला मिळत आहे की, सौंदर्या बोलते की कार्तिक तुझी तेव्हादेखील फर्टिलिटी टेस्ट पॉझिटिव्ह होते आणि आतादेखील पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा कार्तिकने विचारले की कुणी केले. तेव्हा हॉस्पिटलमधील जबाबदार असणारा सांगतो की, तेव्हा मी रिपोर्ट बदलले आणि खोटे रिपोर्ट दिले. तेव्हा कार्तिक विचारतो का केले असे. त्यावर मला असं कुणीतरी करायला सांगितले. तेव्हा चिडून कार्तिक विचारतो कोणी सांगितलं होतं हे करायला. श्वेताने त्याला पकडले गेल्यावर आयशाचं नाव घ्यायला सांगितलेले असते. त्यामुळे आता तो श्वेताचं नाव घेईल की आयशाचं हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :स्टार प्रवाह