Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या २ महिन्यानंतर राणादा उर्फ हार्दिक जोशीचं छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:27 IST

Hardik Joshi And Akshaya Deodhar : अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले.

झी मराठी (Zee Marathi)वरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala)मधून राणादा आणि पाठकबाईंची जोडी हिट ठरली होती. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. आता हे रिल लाइफमधील कपल रिअल लाइफमध्ये लग्नबेडीत अडकले आहेत. हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांच्या लग्नाला २ महिने झाले आहेत. त्यांच्या लग्नाच्या २ महिन्यानंतर आता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 

अभिनेता हार्दीक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नानंतरचे काही दिवस त्यांनी एकमेकांबरोबर छान व्यतित केले. त्यासाठी दोघांनीही कामातून ब्रेक घेतला होता. आता त्या दोघांना पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

दरम्यान अभिनेता हार्दीक जोशी अखेर लग्नाच्या २ महिन्यांनंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. सोनी मराठीवरील सुंदरी या मालिकेत हार्दीक दिसणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. या मालिकेत हार्दीकचा डॅशिंग लुक पाहायला मिळतो आहे. डोळ्याला गॉगल, सूटाबुटातील जबरदस्त लूक समोर आला आहे. हार्दीक सुंदर मालिकेत IAS अजिंक्यची भूमिका साकारणार आहे. सुंदरीच्या ट्रेनिंगसाठी IAS अंजिक्यची मालिकेत एंट्री होणार आहे.

टॅग्स :हार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला