Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक म्हणून रामदास फुटाणे यांचे पुर्नगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:42 IST

लेखक रामदास फुटाणे हे जातीव्यवस्थेवर आसूड ओढणाºया सरपंच भागीरथ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून तब्बल १९ वर्षानंतर पुर्नगमन करीत ...

लेखक रामदास फुटाणे हे जातीव्यवस्थेवर आसूड ओढणाºया सरपंच भागीरथ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून तब्बल १९ वर्षानंतर पुर्नगमन करीत आहेत. या चित्रपटात आरक्षणाचा प्रश्न मोठया कल्पकतेने हाताळलेला आहे. तसेच या चित्रपटात सरपंचाच्या माध्यमातून जातीच्या राजकारणाला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाची कथा आसाराम लोमटे यांची असून त्यावर विष्णू सूर्या वाघ यांनी पटकथा रचली आहे. तसेच या चित्रपटाला संगीत शाहीर संभाजी भगत यांचे असून गायन आनंद शिंदे यांनी केले आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार आहे.