Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा हँडसम अभिनेता रामायणात साकारतोय महत्त्वाची भूमिका, जुना फोटो झालाय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 19:55 IST

या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून हा अभिनेता किती हँडसम दिसायचा असे नेटिझन्स कमेंटद्वारे सांगत आहेत.

ठळक मुद्देसुनील लहरी यांनीच त्यांचा हा जुना फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी हा फोटो पोस्ट करत नववर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना दिल्या होत्या.

रामानंद सागर यांचे रामायण सध्या प्रचंड चर्चेत आहेत. रामायणात भूमिका साकारणारे कलाकारही तितकेच चर्चेत आहेत. अगदी मालिकेतील प्रत्येक कलाकाराला शोधले जात आहे. राम, रावण, सीता, लक्ष्मण, भरत, कैकयी, दशरथ अशा अनेक लहान-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा शोध सुरू आहे. अशात रामायण मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून हा अभिनेता किती हँडसम दिसायचा असे नेटिझन्स कमेंटद्वारे सांगत आहेत.

रामायण या मालिकेत लक्ष्मणच्या भूमिकेत आपल्याला सुनील लहरी यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये या मालिकेत रामाच्या भूमिकेत असलेले अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेत असलेल्या दीपिका चिखलिया यांच्यासोबत हजेरी लावली होती. सध्या त्यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत ते खूपच छान दिसत आहेत. या फोटोत त्यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले असून हातात छत्री घेतली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटिझन्स फिदा झाले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

सुनील लहरी यांनीच त्यांचा हा जुना फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी हा फोटो पोस्ट करत नववर्षाच्या शुभेच्छा त्यांच्या चाहत्यांना दिल्या होत्या. सुनील लहरी यांनी रामायणासोबतच विक्रम वेताळ, परम वीर चक्र अशा मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ते काही चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. 

टॅग्स :रामायण