Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रमण-इशिताच्या आयुष्यात रुही परतणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:47 IST

'ये है मोहब्बते' या मालिकेत सध्या रुहीचा (अदिती भाटिया) ताबा मिळवण्यासाठी रमण (करण पटेल) – इशिता (दिव्यांका त्रिपाठी) आणि ...

'ये है मोहब्बते' या मालिकेत सध्या रुहीचा (अदिती भाटिया) ताबा मिळवण्यासाठी रमण (करण पटेल) – इशिता (दिव्यांका त्रिपाठी) आणि निधी (पवित्रा पुनिया) यांच्यात कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यातच रुहीला मिळवण्यासाठी होणा-या या लढाईतून मालिकेत असा काही ट्विस्ट रसिकही थक्क होतील असं बोललं जातंय. रुहीचा ताबा मिळवण्यासाठी निधी रुहीच्या बर्थडेनिमित्त एका खास पार्टीचं आयोजन करतं.दुसरीकडे रमण रुहीला तिच्या बालपणींच्या फोटोचा कोलाज करुन गिफ्ट करतो. हे फोटो पाहून रुही नॉस्टॅलजिक होते. आता यानंतर रुही रमण आणि इशिताच्या आयुष्यात येते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.