Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रमा राघव' मालिका रंजक टप्प्यावर, आता रमा पाहायला मिळणार दुर्गा रुपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:50 IST

Rama Raghav Serial : 'रमा राघव' मालिकेत रमाला आतापर्यंत सगळ्यांनी अनन्याला तोंड देतांना पाहिलं आहे. पण आता पुन्हा ती तिच्या जुन्या आवतारात पाहायला मिळणार आहे.

‘रमा राघव’ (Rama Raghav Serial) या मालिकेत संस्काराने बदलेल्या आणि प्रेक्षकांना आपल्याश्या वाटणाऱ्या रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा या महारविवारमध्ये सुरू होणार असून या माघी गणपती विशेष भागात ‘श्री गणेशा’च्या दैवी संकेताने रमा पौरोहित्याचा वसा घेणार आहे, हा रंजक टप्पा कसा उलगडणार हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. 

अर्थात रमाने उचलेले हे पाऊल, पुरोहित कुटुंबासाठी घेतलेला हा धाडसी निर्णय तितकाच आव्हानात्मक असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला रमा कशी सामोरी जाते, हे महासोमवार मध्ये घडणारे नाट्य विलक्षण रंजक आहे. घरातली स्त्री ज्ञान देणारी सरस्वती,समृध्दी देणारी लक्ष्मी असते तशीच घराच्या संरक्षणासाठी दुर्गा बनते, हा रमाचा विचार आणि त्यासाठी तिने घेतलेला दुर्गावतार 'न भूतो न भविष्यति' असा आहे. रमा म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणते, मालिकेत एक नवं वळण आलं आहे. रमाला आतापर्यंत सगळ्यांनी अनन्याला तोंड देतांना पाहिलं आहे. पण आता पुन्हा ती तिच्या जुन्या आवतारात पाहायला मिळणार आहे. 

१२ फेब्रुवारीला मनोरंजनाचा दुहेरी धमाका

आतापर्यंत ती तिच्या प्रेमाखातर, कुटुंबखातर शांत होती पण आता रमा दुर्गा रुपात पाहायला मिळणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं सौरक्षण करण्यासाठी हे रूप तिने घेतलं आहे. एक महिला हे सुद्धा करू शकते हे खरच खूप प्रेरणादायी आहे माझ्यासाठी. बोल्ड अँड ब्युटिफुल रमा आता संस्कारांना जपून ती कुटुंबाला सावरते हे पाहणं रंजक ठरेल. ही भूमिका साकारताना जी सकारात्मकता होती, ती प्रेक्षक म्हणून तुम्ही अनुभवू शकाल, तुम्हाला निश्चितच भावेल. ‘रमा राघव’च्या एकत्र प्रवासातला हा उत्कंठावर्धक टप्पा नात्यांचे नवे पदर उलगडत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. छोट्या पडद्यावरील 'रमा राघव' या लोकप्रिय मालिकेत येत्या रविवारी ११ फेब्रुवारीला महारविवार आणि सोमवारी १२ फेब्रुवारीला महासोमवार असा मनोरंजनाचा दुहेरी धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.