Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये घेतला राम कपूरने तिसरा बंगला; २,८०० चौरस फुटांना साडेअकरा कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 07:12 IST

घर खरेदीच्या पूर्ततेसाठी ते अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते.

अलिबाग - उद्योजक, क्रिकेटर, अभिनेते यांना अलिबागच्या सौंदर्याची भुरळ पडली असून अभिनेता राम कपूर आणि गौतमी कपूर यांनी साडेअकरा कोटींचा तिसरा बंगला विकत घेतला आहे. कपूर कुटुंबाने या बंगल्यासाठी ६९ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरून २,८०० चौरस फूट जागा व भव्य तरण तलाव असलेले घर खरेदी केले आहे.

घर खरेदीच्या पूर्ततेसाठी ते अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. कपूर कुटुंबाने ६९ लाखांचे मुद्रांक शुल्क भरले आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, असे ॲड. महेश म्हात्रे यांनी सांगितले. अलिबाग विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि नारळ- सुपारी बागांनी बहरलेले आहे. 

सेलिब्रिटींची गर्दीमांडवा, धोकवडे, सासवणे, किहीम, आवास, नागाव, अलिबाग याठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात फार्म हाऊस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू याचा बंगला, फार्म हाऊस, जमीन खरेदी करण्याकडे कल अधिक वाढला आहे.

टॅग्स :राम कपूर